इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारताने क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर घरसला आहे.दरम्यान पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताची क्रमवारीत घसरण झाली होती.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं इंग्लंड संघाचा ३१७ धावांनी पराभूत केला होता. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतायी संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपंल आव्हानं जिवंत ठेवलं आहे. तर दुसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर भारत दुसऱ्या स्थानी आला आहे.
चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार न्यूझीलंडचा संघ प्रथम स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाची विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे.
Comments
Loading…