in

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी…आता दरवर्षी होणार भारत-पाकिस्तान सामने

भारत-पाकिस्तानमध्ये होणारा वर्ल्डकपचा सामना असो अथवा एखाद्या मालिकेतला सामना दोन्ही सामन्यांना क्रिकेटप्रेमी मोठ्या आतुरतेने पाहत असतात.याच प्रेक्षकवर्गासाठी आता मोठी बातमी आहे. दरवर्षी भारत-पाकिस्तान सामने होणार आहेत.

आयसीसीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हेसुद्धा उपस्थित होते. यात २०२४ ते २०३१ अशा कालावधीतील सर्व स्पर्धा जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे फ्युचर टूर प्रोग्राम (एफटीपी) अंतर्गत दरवर्षी टी-२० वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामने होतील.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोनाजन्य स्थिती पाहता हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक

 • २०२१ – टी-२० वर्ल्डकप (भारत)
 • २०२२ – टी-२० वर्ल्डकप (ऑस्ट्रेलिया)
 • २०२३ – एकदिवसीय वर्ल्डकप (भारत)
 • २०२४ – टी-२० वर्ल्डकप
 • २०२५ – चॅम्पियन्स करंडक आणि WTC FINAL
 • २०२६ – टी-२० वर्ल्डकप
 • २०२७ – एकदिवसीय वर्ल्डकप (50 षटक) आणि WTC FINAL
 • २०२८ – टी-२० वर्ल्डकप
 • २०२९ – चॅम्पियन्स करंडक आणि WTC FINAL
 • २०३० – टी-२० वर्ल्डकप
 • २०३१ – एकदिवसीय वर्ल्डकप आणि WTC FINAL

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना ५ लाखांची मदत

HSC Exams | राज्यातील १२वीच्या परीक्षा रद्द… शिक्षणमंत्र्यांचे संकेत