in

India vs England|तिसऱ्या कसोटीत भारताचा विजय

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेले ४९ धावांचं आव्हान भारताने सहज पूर्ण करत 10 विकेट राखून विजय मिळवला आहे.

भारताने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांवर गुंडाळला. यावेळी टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर अश्विनने 4 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावा पाहिजे होत्या. रोहित 25 आणि शुभमन गिलने 15 नाबाद सहज पूर्ण करत 10 विकेट राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे आता चार कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे.

अश्विनचा ४०० बळींचा विक्रम

दुसऱ्या डावांत तिसरा बळी घेत अश्विन यानं कसोटी क्रिकेटमध्ये ४०० व्या बळींची नोंद केली आहे. अश्विन यानं २१ हजार २४२ चेंडूमध्ये ४०० बळी घेतले आहेत. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विननं हा माईलस्टोन गाठला. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा एकूण १७ वा आणि भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपील देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या भारतीय गोलंदाजांनी हा विक्रम केला आहे. २०११ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अश्विन यानं ७७ व्या कसोटी सामन्यात ४०० बळींचा टप्पा पार केला आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : पहिला डाव – ४८.४ षटकांत सर्वबाद ११२ (झॅक क्रॉवली ५३, जो रुट १७, अक्षर पटेल ६/३८, अश्विन ३/२६)

दुसरा डाव – ३०.४ षटकांत सर्वबाद ८१ (बेन स्टोक्स २५, अक्षर पटेल ५/३२, अश्विन ४/४८)

भारत  : पहिला डाव – ५२.२ षटकांत सर्वबाद १४५ (रोहित शर्मा ६६, विराट कोहली २७, जो रुट ५/८, जॅक लीच ४/५४)

दुसरा डाव : ७.४ षटकांत बिनबाद ४९ (रोहित शर्मा २५*)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुकेश अंबानीच्या घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार

संजय राठोड यांचे शक्तिप्रदर्शन भोवले, पोहरादेवीच्या महंतासह सातजण कोरोना पॉझिटिव्ह