in

India vs England 5th Test : कसोटी सामना रद्द

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्याक आज मँचेस्टरच्या (Manchester) ओल़्ड ट्रॅफॉर्ड मैदानात 5वा कसोटी (5th Test) सामना खेळवला जाणार होता. पाचवी आणि निर्णायक अशी ही कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाची होती. पण कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमेकांच्या सहमतीने आजच्या दिवशीचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षख आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर आज होणारी पाचवी कसोटी पुढे कलण्यात आली आहे. सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह ही दिलासादायकबाब आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चेंबूर

पाटण