in

Ind Vs Eng 4th Test : पहिल्या सत्रात इंग्लंडची खराब सुरुवात… तीन गडी माघारी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्याला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील हा अखेरचा सामना असणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच सत्रात तीन फलंदाज बाद झाले आहेत. फिरकीपटू अक्षर पटेल याने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलंय. मोहम्मद सिराजने कर्णधार जो रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. सध्या ५६ धावांवर इंग्लंडचे तीन खेळाडू माघारी परतले आहेत.

चौथ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंकडून जोफ्रा आर्चर आणि स्टुर्अट ब्रॉड हे बाजू सांभाळत आहेत. फलंदाजी भक्कम करण्यासाठी इंग्लंडने डॅनियल लॉरेन्सला संघात स्थान दिलं असून स्पिनर डोमिनिक बेस यालाही अखेरच्या कसोटीत संधी मिळाली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी असून, जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंडला भिडण्यासाठी अखेरची कसोटी किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यासाठी थेट पात्र ठरेल.

संघ

  • भारत : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर) , आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा.
  • इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, डी लॉरेन्स, बेन फोक्स, डॉमनिक बेस, जॅक लीच, आणि जेम्स अँडरसन.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डॉक्टरचा कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; औरंगाबादमध्ये खळबळ

सचिन तेंडूलकरला ताडोबातील वाघांची भुरळ