in

IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज तिसरा कसोटी सामना

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. सध्या चार कसोटी मालिकेच्या सामन्यात दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत. तिसऱ्या कसोटीवर कोण बाजी मारतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे. मोटेरा हे नव्याने बांधण्यात आलेलं स्टेडिअम असून त्याचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या आठवड्यात दुसऱ्या कसोटी सामना झाल्यानंतर बीसीसीआयने मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आलेला भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याद्वारे कमबॅक करेल, असं बोललं जात आहे. त्यासाठी मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. इशांत शर्मा या सामन्यातही खेळणार आहे हे निश्चित आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे.

संघ :

 भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

*  इंग्लंड : जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्‍स, झॉक क्रॉवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘त्या’ शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

मंत्रालयाचे कामकाज होणार दोन शिफ्टमध्ये? मुख्यमंत्र्यांची मुख्य सचिवांना नियोजन करण्याची सूचना