in

वायुसेनेच्या विमानाचा अपघात

आज गुरुवारी सकाळी भारतीय वायुसेनेच्या विमानाचा मध्यप्रदेशात अपघात झाला. भारतीय हवाई दलाचे मिराज 2000 विमान मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बाबडी गावात कोसळले. वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट अभिलाष सुरक्षित आहेत. पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
विमानांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्याता वर्तवली जात आहे. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना देताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.


“आयएएफच्या मिराज 2000 विमानात आज सकाळी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. विमान शेताक कोसळले असून, अपघातात पायलट सुखरूप आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” असं ट्विटरवरून हवाई दलाने कळवले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ तारखेला थिएटरमध्ये रंगणार ‘जयंती’

Oscar 2022 | ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?