लोकशाही न्यूज नेटवर्क
आज १४ फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस. मात्र दोन वर्षांपूर्वी हाच दिवस संपूर्ण देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी एक काळा दिवस ठरला होता. पुलवामा येथे दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहिद झाले होते. याच पाश्वभूमीवर आज देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सच्या वतीने ट्विटवर पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या ट्विटमध्ये भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ट्विटरवर 1.42 मिनिटांची व्हिडिओ क्लिप शेअर केली असून या घटनेची माहिती एकत्रित केली असून या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये विडिओच्या शेवटी “बिठाकर पास बच्चों को जो कल किस्से सुनाता था, उसे किस्सा बनाने को, क्या जायज़ ये धमाका था.” असे लिहिले आहे. विडिओच्या पाठीमागे वाजणारे गाणे व्हिडिओला अजूनच प्रभावी करत आहे.
पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण होत असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला आणि स्फोटकांनी भरलेल्या कारला धडक दिली. यानंतर सीआरपीएफच्या बसमध्ये स्फोट झाला. या अपघातात ४० सैनिक ठार झाले, तर ७० सैनिक गंभीर जखमी झाले.
Comments
Loading…