इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला.या विजयासह भारताने 2-1 ने मालिका खिशात घातली.
भारताच्या ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर यांनी संकटसमयी केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. भारतीय संघाने टीम इंडियाला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्याला कडवी झुंज देत 329 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडला सुरुवातीच्या ओव्हरमध्येच दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दोघांना बाद केले.
इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. जेसन रॉय 14, जॉनी बेअरस्टॉ 1, बेन स्टोक्स 35, डेविड मालन 50, जोस बटलर 15, लियाम लिविंगस्टोन 36, मोइन अली 29, अदिल रशिद 19, मार्क वूड 14 धावा केल्या. तर सॅम कुर्रन याने सर्वाधिक 95 धावा केल्या. या धावांच्या बळावर 9 गडी बाद होत 322 धावापर्यंतच मजल मारता आली.
Comments
Loading…