in

‘पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचाचं असेल’, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुणे महापालिका निवडणूक आणि राजकीय गणितांवर मोठं भाष्य केलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचा असेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचाही महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय.

त्याचबरोबर राज्यात अनेक पॅटर्न येतात आणि जातात. पण सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. हा एक चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेसची सोबत आली तर काय होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही मतांचं विभाजन होऊ देणार नाही, असा दावाही राऊत यांनी यावेळी केलाय.

बाळासाहेब ठाकरे सातत्यानं पुण्यात येत होते. आम्ही पुण्यात संघटनेचं काम करतो. तरी आमचा पुण्यात महापौर बसू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची, पुणेकरांची इच्छा आहे. आमचं स्वप्न आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांवर शिवसेनेचा महापौर असावा, असंही राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

सीमाप्रश्नी सर्व पक्षांनी एकत्र यावे – शरद पवार