in ,

indo-china dispute| भारत आणि चीनमध्ये लवकरच पार पडणार चर्चेची १२ वी

तीन महिन्यांनंतर भारत आणि चीन यांच्या लष्करादरम्यान मोल्दो येथे कॉर्प्स कमांडर चर्चेची १२ वी फेरी पार पडणार आहे. या चर्चेची शेवटची फेरी ९ एप्रिलला झाली होती. त्यात कोणताही सकारत्मक निर्णय न झाल्याने उभय देशांच्या लष्कराने पुन्हा वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेवटच्या फेरीत चीनने हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा पोस्टमधून आपले सैन्य मागे घेण्यास नकार दिला होता. या दोन्ही जागेवरून कायम भारत आणि चीन मध्ये संघर्ष होत असतो. फेब्रुवारीमध्ये भारत आणि चीन सैन्याने पँगॉंग-त्सो आणि कैलास पर्वतरांगेच्या उत्तर आणि दक्षिण भागातून सैन्य मागे घेतले होते.

हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा पोस्टमधील पेट्रोलिंग पॉइंट 15 आणि पी पी-१७ ए येथे चीनी सैन्य मागे घेण्यास तयार होते. मात्र नंतर नकार दिला. चर्चेच्या शेवटच्या टप्य्यात जो काही निर्णय झाला, त्यावर भारत सहमत असावा, असं चीनने म्हटलं आहे.

चर्चेनंतर भारत आणि चीनी सैन्यादरम्यान जे काही करार आणि नियम असतील त्यानुसार लवकरात लवकर दोन्ही बाजूंच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तोडगा काढावा, आणि हॉट स्प्रिंग्स, गोगरा पोस्टमध्ये शांतता प्रस्थापित करावी. तसेच उभय सैन्यामध्ये उत्तम संबंध निर्माण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo 2020 । टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी ‘या’ स्पर्धा होणार

रायगडमध्ये 42 मृतांच्या वारसांना 4 लाखाची मदत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती