in ,

अरुणाचल प्रदेशात घुसखोरी; 200 चीनी सैनिकांना पळवले

अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर चीनचे सुमारे २०० सैनिक तिबेटच्या दिशेने भारतीय सीमेत घुसले होते. त्यातील काही चिनी सैनिकांना ताब्यात घेतले गेले. चिनी सैनिक मागे हटण्याच्या आधी भारतीय सैनिकांशी त्यांचा सामना झाला. या घटनेत भारतीय सुरक्षा दलाची हानी झाली नाही.

अरुणाचलमध्ये चीनी सैनीक घुसण्याची घटना दीर्घकाळानंतर घडली आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून चीन व भारताचे सैन्य आमने-सामने येत आहेत.

पूर्व लडाखमध्ये दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून तणाव सुरू असतानाच अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याच्या कारणामे समोर येत आहेत. एलएसी वर भारत व चीनचे सैनिक गेल्या आठवड्यात आमने-सामने आले हाते. सध्याच्या प्रोटोकॉलनुसार दोन स्थानिक कमांडर यांच्यातील चर्चेनंतर चिनी सैनिक पळाले. सीमावाद सोडवण्यासाठी ३-४ दिवसांत कमांडर स्तरीय १३ वी बैठक होण्याची शक्यता आहे.

सुमारे ९ महिन्यांपूर्वी चिनी सैनिकांनी अरुणाचलमध्ये भारताच्या सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये गाव वसवल्याचे सांगण्यात असून हे गाव सुबनसिरी जिल्ह्यात सारी चु नदीच्या किनारी आहे. चीनच्या १०० सैनिकांनी ३० आॉगस्ट रोजी उत्तराखंडच्या बाराहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केली आणि तीन तास तेथे राहिल्यानंतर ते परतले.

अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भागात चीन मोठ्या प्रमाणात बांधकामे करू लागला आहे. त्यात ब्रह्मपुत्र नदीवर अनेक मोठे जलविद्युत प्रकल्पांचाही समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तळेगाव ठाण्यात डीजे वाजवल्याचे प्रकरण अंगलट

चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत ‘हे’ नेते दाखल