प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. हाजीआली जवळील एका ट्रॅफिक सिग्ननलवरचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. संबंधित चारचाकी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हाजीआली जंक्शनमध्ये 10 मिनिटं थांबली होती. त्यानंतर ही गाडी अँटिलियाच्या दिशेने रवाना झाली. ही संशयास्पद गाडी विक्रोळीमधून चोरी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान याप्रकरणात 9 लोकांची चौकशी सुरू आहे आणि याप्रकरणी 2 लोकांची सखोल चौकशी सुरू आहे. यापैकी जवळपास सर्वजण या घटनेचे साक्षीदार आहेत. मुंबईच्या vvip परिसरात गाडी मध्ये आढळून आलेल्या स्पोटक प्रकरणात विजय स्टोर या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तपासात या फुटेजचा खूप उपयोग होणार आहे.
मुंबईच्या पेडर रोड परिसरात एका रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्यानं खळबळ उडाली होती. ही बेवारस गाडी या परिसरात तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे बंगले, राजकीय व्यक्तींची ये-ज, दूतावास कार्यालयं आहेत आणि तिथेच स्फोटकांची गाडी सापडल्याने अधिकच चिंतेचा विषय आहे.
Comments
Loading…