in

शाळा पोहोचली विद्यार्थ्यांच्या दारी, गडचिरोली जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोईनगुडा गावात विद्यार्थ्यांच्या दारातच शाळा पोहचली आहे. यंदाचे नवे शैक्षणिक सत्र सुरू झालंय. गेले दीड वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण शाळा ऑनलाईन सुरू आहेत. ग्रामीण भागात शिक्षक मुलांचे गट बनवून स्वतः वर्ग घेत अभ्यासक्रम पूर्ण करतायेत. अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील कोईनगुडा हे असेच नक्षलग्रस्त गाव आहे.

प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत थेट त्यांच्या घरी जाऊन करण्याची कल्पना पुढे आली. शिक्षकांनी वाजंत्री लावून फुगे-चॉकलेट-भेटवस्तू- पाठ्यपुस्तके देत चिमुकल्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी केलेल्या प्रयत्नांनी विद्यार्थी हरखून गेले.भामरागड तालुक्यातील कोईनगुडा गावातील उपक्रमाने पंचक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मायक्रोसॉफ्टमधील बग शोधण्यासाठी अदिती सिंगला मिळाले 22 लाख रुपये

नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावर… उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम देण्याची मागणी