इन्स्टाग्रामवर लोकप्रिय स्टार समीर गायकवाडची याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.अल्पवधीतच समीरने व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणाईला आवडणाऱ्या स्टाइलमध्ये वैचारिक संदेश देण्याच्या कलेमुळे अफाट लोकप्रियता मिळवली होती. समीरच्या मृत्यूसंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर इन्सटाग्रामवरील त्याच्या चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.
साडीच्या सहाय्याने समीरने घरातील आपल्या रुममधील पंख्याला फास लावून समीरने आत्महत्या केली. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला खाली उतरवरुन तातडीने लाईफ लाईन रुग्णालयामध्ये नेले. तपासणी झाल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले . ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. लोणीकंद पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत .
समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोणतीही सुसाईड नोट समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता समीरच्या भावाची आणि जवळच्या नातेवाईकांची या प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच समीरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भातील काही माहिती समोर येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Loading…