in ,

पुण्यातील ‘शक्ती’ आत्महत्येप्रकरण त्या ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा

लोकशाही न्यूज नेटवर्क

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे’, असे नमूद करत या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.

पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मृत तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्ससुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरवाढी : ‘मनसे’ च्या निशाण्यावर भाजपा आणि शिवसेना

तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाका फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू