in

जबरदस्त फीचर्ससह iPad आणि iPad Mini लाँच

Apple ने आपल्या कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग इव्हेंटमध्ये iPhone 13 Series, Apple series 7 सह iPad आणि iPad mini लाँच केले आहे.हा iPad नवव्या जनरेशनचा iPad आहे. iPad mini चं डिझाइन पूर्णपणे नवं असून याचा लूक iPad air आणि iPad pro प्रमाणे आहे.नव्या Apple iPad मध्ये पूर्णपणे नवा कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे, जो 122 डिग्री व्ह्यू देतो.

नव्या iPad मध्ये 10.2 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे, जो आधीच्या iPad मॉडेल्समध्येही उपलब्ध होता.परंतु या डिस्प्लेमध्ये ट्रू टोन सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यात स्क्रिन कलर टेम्परेचर अ‍ॅडजस्ट करण्यास मदत होते.देशात नव्या iPad ची किंमत wifi मॉडेलसाठी 30,900 रुपयांपासून सुरू होते. याच्या wifi आणि सेल्युलर मॉडेलची सुरुवातीची किंमत 42,900 रुपये आहे.

यामध्ये 64GB पासून पुढे स्टोरेज ऑप्शन असून दोन कलमध्ये नवा iPad उपलब्ध आहे. iPad mini ची किंमत wifi मॉडेलसाठी 46,900 रुपयांपासून सुरू होते. याच्या wifi सेल्युलर मॉडेलची सुरुवातीची किंमत 60,900 रुपये आहे. iPad mini 64GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह पाच कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरपूरकरांना मोठा दिलासा; निर्बंध आणखी शिथील केले

Devendra Fadnavis आणि Jayant Patil यांचा एकाच गाडीतून प्रवास