लोकशाही न्यूज नेटवर्क | IPL 2021 च्या हंगामासाठी येत्या 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावासाठी जवळपास एकूण 1,114 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली असून 292 खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. लवकरच या खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
IPL 2021 च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत विविध देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये लिलावासाठी 292 खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीत ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्याबरोबरच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या बोलीवरही साऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
सर्वाधिक २ कोटी इतकी मूळ किंमत असणाऱ्यांमध्ये हरभजन सिंग, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वूड या खेळाडूंचा समावेश आहे. दीड कोटी मूळ किंमत असणारे १२ तर १ कोटी मूळ किंमत असणारे ११ खेळाडू आहेत.
लिलाव
IPL 2021 च्या हंगामासाठी १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. चेन्नईमध्ये हा लिलावाचा सोहळा पार पडणार आहे. दुपारी ३ वाजता लिलाव प्रक्रियेला सुरूवात होणार असून हा केवळ एकाच दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. या लिलावासाठी एकूण 164 भारतीय, 125 परदेशी आणि ICCशी संलग्न असलेल्या देशाचे 3 असे एकूण 292 खेळाडू उपलब्ध असणार आहेत.
Comments
Loading…