in

IPL 2021, RR vs PBKS | पंजाबनं नाणेफेक जिंकली, घेतला गोलंदाजीचा निर्णय

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आज दुबईच्या मैदानात सामाना खेळवला जातोय. सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबनं आजच्या सामन्यात ख्रिस गेल याला विश्रांती दिली आहे. त्यामुळे गेलच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. पण दुसऱ्याबाजूला राजस्थाननं आपल्या संघात तगड्या खेळाडूंना संधी दिली आहे. राजस्थानच्या संघात लियाम लिव्हिंगस्टोन याचं पुनरागमन झालं आहे. तर विंडीजच्या लुईसला संधी देण्यात आली आहे. यासोबतच बांगलादेशच्या मिस्तफिजुर रेहमान याला संघात जागा देण्यात आली आहे.

आजच्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोन, एविन लुईस हे राजस्थानकडून, तर पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुल आणि निकोलस पुरन चौफेर फटकेबाजीसाठी सज्ज आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांना अपेक्षित कामगिरी करण्यात यश आलेले नाही. लोकेश राहुलला केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात पंजाबचा कर्णधार म्हणूनही छाप पाडावी लागणार आहे. नुकताच द हंड्रेड स्पर्धेत छाप पाडलेल्या लिव्हिंगस्टोनकडून राजस्थानला मोठी अपेक्षा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले

नोव्हेंबरपासून अमेरिकेच्या प्रवासासाठी नवे नियम जाहीर