in ,

IPL वर पुन्हा कोरोनाच संकट?; ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित, संपर्कातील सहा जण विलगीकरणात

एप्रिलमध्ये कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. आता आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती मिळाली आहे.

सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनला करोनाची लागण झाली आहे. आरटीपीसीआर चाचणी केली असता टी नटराजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलने दिली आहे. टी नटराजनला कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. सनरायजर्स हैदराबादचा आज दिल्ली कॅपिटल्ससोबत सामना होणार आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत खेळलं जात असून हैदराबादचा हा पहिलाचा सामना आहे. दरम्यान टी नटराजनसोबत हैदराबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे.

आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता जवळच्या संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल”.

टी-नटराजनच्या संपर्कात आलेले ते सहाजण ज्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यामध्ये विजय शंकर, टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर. नेट गोलंदाज पेरियासॅमी गणेशन यांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता रेशनदुकानातही करता येणार पासपोर्ट आणि पॅनकार्डसाठी अर्ज

सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप नाही,पण राष्ट्रहितासाठी आम्ही दबाव टाकतो – मोहन भागवत