इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी ट्विट करावं नाही तर त्यांचे शुटिंग बंद करू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी चित्रीकरण रोखून दाखवाच असे म्हणत प्रतिउत्तर दिले आहे.
नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवावचं, असं आव्हानच त्यांनी महाजन यांनी दिलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या मुद्दयावरून कोणीही राजकारण करू नये. असे देखील गिरीश महाजनांनी यावेळी माध्यमांना सांगितले.
नाना पटोले यांची टीका :
देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत असताना, काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढ झाल्यावर ट्विट करणारे सिनेकलाकार आता काहीच का बोलत नाहीत. या विरोधात आक्रमक होऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.
Comments
Loading…