in

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं ? , म्हणतं भाजपा नेत्यांचा हल्लाबोल

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारने होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातले असून, त्याविरोधात भाजपा नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारनं होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेणार नाही. हिंदूनों जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार,”अशी शब्दात अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र उभारले आहे.

तर दुसरीकडे “हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचं पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? अन्य धर्मांना तातडीनं परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात की वसुली सरकारचे?,” अशी टीका भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

सणांना घेऊन सरकारची भूमिका
होळीच्या आधीचं कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून होळी व धूलिवंदनासाठी नियमावली जारी केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेनं शहरांत सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनीही नागरिकांना सूचना दिल्या आहेत. होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. तर राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका करत भाजपा नेत्यांनी ‘शिवसेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून होळी साजरी करा’,असं आवाहन केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

होळी घरात पेटवायची का? – राम कदम

मेळघाटात नवनीत राणा यांची तुफान बॅटींग , सोशल डिस्टनचे तीनतेरा