in ,

सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड…; चंद्रकांतदादांचं सूचक विधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाच वर्षे टिकेल असं म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असं चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, सरकार टिकेल हे का सांगावं लागतं? सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीच असते. ते सांगावं लागत नाही. ज्यावेली तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावं लागतं, असं सांगतानाच पवारांची तब्येत बिघडली आहे. सरकारचं मला माहीत नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असं ते म्हणाले असते. पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही, असंही ते म्हणाले. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून हे चित्रं कमी झालं आहे.

विरोधी पक्ष म्हणजे दुश्मनच असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु, काही असलं तरी राजकीय भेटी घेण्यात काही वावगं नाही, असंही ते म्हणाले. भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bank Holidays | ‘या’ कारणामुळे एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद

CoronaVirus | कोरोनाचा कहर; दुसरी लाट अधिक आक्रमक