लसीकरणानंतरही पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे रुग्णसंख्या कमी न झाल्यास सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे हा भाग कंटेन्मेंट झोन करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “मागील आठ दिवसात दररोज साधारण 300 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे भागातील रुग्णसंख्या हि अधिक आहे. त्यामुळे या भागात तपासण्या करण्यावर भर दिला जाणार आहे.
मात्र भविष्यात रुग्ण संख्या कमी न झाल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन कंटेन्मेंट झोन करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क लावून आणि सोशल डिस्टंन्सिंगचा वापरा करावा” असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Loading…