in ,

‘ये तो सिर्फ ट्रेलर है’; अंबानींना धमकीच्या पत्राने खळबळ

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली असून यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. तसेच या कारमध्ये धमकीचे पत्र देखील आढळून आले आहे. या प्रकारानंतर मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षेत वाढ झाली आहे.

गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये काय लिहले होते?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने..संभल जाना.’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे.

‘त्या’ गाडीत मिळाल्या नंबरप्लेटस

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस नक्की कशासाठी होता याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र, या नंबरप्लेटसचे वाहतूक विभागाकडे (RTO) असलेले रेकॉर्ड तपासल्यावर माहिती समोर आली आहे.

1) MH 04 DN 9945

गाडीचा नंबर ठाणे आरटीओ रजिस्ट्रेशनचा आहे. पण या नंबरवरुन तपासणी केली असता गाडीचे पुर्व मुंबई आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केले असून गाडी “कोलंबिया एम्बसी, परदेशी गाडी” असं रजिस्ट्रेशन मध्ये नमूद करण्यात आली आहे. ही गाडी 12 वर्षे जुनी असून रजिस्ट्रेशन मध्ये गाडी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना गाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन लकी डी या मुलूंडमधील व्यक्तीच्या नावाने करण्यात आले आहे.

2) MH 01 BU 6510

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी सहा वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ असल्याचे RTO रजिस्ट्रेशनमध्ये नमूद केले आहे.

3) MH 01 CZ 7239

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालकाचे नाव रजिस्टर मध्ये निशांत सुर्वे असे नमूद करण्याच आले आहे आणि गाडी ही हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची जॅग्वार रेंज रोवर असल्याचे रजिस्टर मध्ये नमूद आहे

4) MH 01 DK 9945

या गाडीचा नंबरदेखील मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपणीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी १ वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची रेंज रोवर गाडी आहे असं RTO रजिस्ट्रेशन मध्ये नमूद आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल डिझेलच्या किंमती धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

अंबानींच्या घराजवळील संशयास्पद गाडी विक्रोळीतून चोरली; मुंबई पोलिसांच्या हाती CCTV फुटेज