in

Jammu and Kashmir | सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 दिवसांत तिरंगा फडकणार

जम्मू-काश्मीरमध्ये उपराज्यपालांनी येथील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये तिरंगा फडकविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय जम्मू यांनी सर्व उपायुक्त आणि विभाग प्रमुखांना पुढच्या पंधरा दिवसांत सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावण्यासंदर्भात उपराज्यपालांच्या सूचना लागू करण्यास सांगितले आहे. जम्मूचे विभागीय आयुक्त यांना मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या भारतीय ध्वज संहितेच्या तरतुदीनुसार जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सुनिश्चित करण्यासाठी जम्मू विभागातील विविध विभागांच्या उपायुक्त आणि विभागीय प्रमुखांना सांगितले गेले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित करण्यात आला. त्यानंतर आता नायब राज्यपालांकडून जम्मू आणि काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज स्वीकारण्यात आला होता.

दरम्यान, ११ जुलै १९५२ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये एक विधेयक मंजूर करून स्वतंत्र ध्वजाला मान्यता देण्यात आली होती. यामुळे भारताचा आणि जम्मू-काश्मीरचा ध्वज स्वतंत्र झाला होता. भारतीय घटनेच्या अनुच्छेत १४४ नुसार जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र ध्वजाला पुढे मान्यात देण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर आता एक देश, एक ध्वज अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गडचिरोली | महाराष्ट्र पोलिसांना नक्षलविरोधी मोहिमेत यश

पुण्यात सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळती… ३०० जणांना बाहेर काढण्यात यश