कोरोना संक्रमणाचा धोका असल्यामुळे मागील वर्षभरापासून बंद असलेले कुलाबा येथील जहांगीर कलादालन पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे कलाप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
जहांगीर आर्ट गॅलरीत ज्येष्ठ, श्रेष्ठ, नवोदित, संघर्षशील, शहरी, ग्रामीण अशा सर्वच दृश्यकलावंतांची प्रदर्शनं इथं भरतात. ही कलाकृती पाहण्यासाठी नेहमीच कलाकारांची नेहमीच रेलचेल असते. मात्र कोरोना व्हायरसमुळे शहरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जहांगीर आर्ट गॅलरीची दालने बंद करण्यात आली होती.
मागीलवर्षी १५ मार्चपासून बंद करण्यात आलेले जहांगीर कलादालन कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून तब्बल 11 महिन्यानंतर पुन्हा एकदा आजपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता चित्रकार/ शिल्पकारांच्या कलाकृतींनाही वाव मिळणार असून कलाप्रेमींचीही गर्दी जमण्यास सुरुवात होणार आहे.
जहांगीर आर्ट गॅलरी सोबत ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ म्हणजे ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ही तब्बल 11 महिन्यानंतर खुल झाल आहे. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये गतकाळातील संस्कृती आणि समाज यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक वस्तू आहेत. त्यामुळे ही दोन्हीही दालने सुरू झाल्याने कलाप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत.
Comments
Loading…