नेहमीच वेगवेगळे विषय हाताळणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता वेगळा विषय घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन या चित्रपटात प्रमुख असणारा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या १८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचं वृत्त समोर येत होते. एका वर्षापूर्वी ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. मात्र काही कायदेशीर अडचणींमुळे आणि करोना संकटामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता तो १८ जून २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेने तसंच या चित्रपटाच्या टीमनेही आपल्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. असं हे भन्नाट मिश्रण असल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे यात शंका नाही.
Comments
Loading…