in

शरद पवारांनी आपल्या आयुष्यात अनेक मित्र जोडले – जितेंद्र आव्हाड

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार आपल्या आयुष्यात अनेक मित्र जोडले आहेत असे म्हणत आपले मत मांडले.

शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही पण 50 वर्षांच्या राजकीय जिवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहे मग त्यातील कश्मीर चे फारूक अब्दुल्ला असतील उडीसा मधले विजू पटनाईक असो बंगाल मधले जोती बसु असो ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत आपल्या राज्यातील प्रमोद महाजन हे त्यांचे अत्यंत जवळचे होते त्यामुळे संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंडोनेशिया | चर्चसमोर भयंकर बॉम्बस्फोट

गडचिरोली जिल्ह्यात आष्टी-आलापल्ली मार्गावर भीषण अपघात , ४ ठार तर १० जखमी