in

फोन टॅपिंग प्रकरण : …अजून पुरावे काय पाहिजेत, जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर निशाणा

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून राजकारण तापले आहे. रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल केली होती. आज त्यांनी ट्विट करत यामागे भाजपा असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे टीकास्त्र त्यांनी डागले होते. रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केले. त्याचा उपयोग आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरुद्ध होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

तर, आज त्यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले आहे. ‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर राहावं, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत?’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन-सचिन वाझेंच्या भेटीचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर…

विकी कौशलने सुरू केला धनुर्विद्येचा सराव