in ,

जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश; महाराष्ट्रात पडसाद

काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भाजपप्रवेशाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खोचक शब्दांमध्ये ट्वीट केले असून भाजपा नेते निलेश राणे यांनी थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करणारे काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांना खोचक निशाणा साधला आहे. “काय प्रतिकात्मक फोटो आहे! इथे हनुमान छाती फाडून दाखवत आहेत. भगवान श्रीराम यांच्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करत आहेत. आणि तिथेच जितिन प्रसाद देखील आहेत”, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

राहुल गांधीनी भाजपात प्रवेश करावा

भाजपा नेते निलेश राणे यांनी जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावरून थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच सल्ला दिला आहे. “राहुल गांधींच्या जवळचे सगळेच नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाच हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वत: भाजपात प्रवेश करावा, हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा सल्ला निलेश राणेंनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ट्विटर नरमलं… डिजिटल नियमांचं पालन करण्याचं आश्वासन!

Mumbai Rains : “ही कुणाची जबाबदारी?” मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता