in

जम्मू-काश्मीर लहान मुलीचा व्हीडिओ व्हायरल, होमवर्कविरोधात थेट पंतप्रधानांनाच केली तक्रार

सोशल मिडीयावर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या जम्मू-काश्मीरमधील लहान मुलीचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत होत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून ऑनलाईन क्लासेसला कंटाळलेल्या या चिमुकलीनं तिची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडली. विशेष म्हणजे या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच त्यावर कारवाईही करण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये ही चिमुकली म्हणतेय, “अस्सलाम वालेकुम मोदी साब. मी एक मुलगी बोलतेय आणि मी सहा वर्षांची आहे. मला झूम क्लास बद्दल काही बोलायचं आहे.” असं म्हणत या चिमुकलीनं तिच्या तक्रारींचा पाढा वाचला. “सहा वर्षांची लहान मुलं जी असतात, त्यांना एवढं काम (अभ्यास) का देतात शिक्षक. मी सकाळी 10 ते 2 पर्यंत क्लास करते. इंग्लिश, मॅथ, उर्दू, ईव्हीएस आणि कम्प्युटर.. एवढं काम तर मोठ्या मुलांना असतं, जे सहावी, सातवी दहावीत असतात. लहान मुलांना एवढं काम का देतात मोदी साब.”

जम्मू काश्मिरमध्ये एका चिमुकलीमुळं प्रशासनाला ऑनलाईन शिक्षण विभागाच्या धोरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांनी ऑनलाईन क्लासेससाठी नवे दिशानिर्देश जाहीर करत त्याच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोककलावंत कांताबाई सातारकर यांच्यानंतर कन्या आणि नातवाचंही निधन

“अनाथ मुलांसाठी दोन्ही सरकारने परस्पर सामंजस्याने काम करावे”