in

शुटींग दरम्यान स्टंटबाजीत जॉन अब्राहम जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘अटॅक’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दुखापत होऊन जॉन अब्राहम जखमी झाला आहे.

जॉन एक फाईटिंग सिक्वेंस शूट करत होता. यावेळी एक गुंड जॉनच्या अंगावर ट्यूबलाईल फोडतो असा सीन शूट केला जाणार होता. परंतु हा सीन शूट करत असताना सहकलाकाराचा तोल गेला अन् ती ट्यूबलाईट जॉनच्या मानेवर फुटली. यातील काही काचा जॉनच्या चेहऱ्यावर देखील उडाल्या आणि रक्त वाहू लागलं. रक्त पाहून दिग्दर्शकानं त्वरित चित्रीकरण थांबवले.

जॉनने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्याने . “हे जे काही चाललं आहे ते मला खूप आवडतंय” अशा आशयाची कमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे. या चित्रपटात राकूल प्रित सिंह आणि जॅकलिन फर्नांडिस देखील झळकणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वृक्षांची कत्तल : भाजपा आक्रमक आणि शिवसेनावर हल्लाबोल

मध्यप्रदेश : गुनामध्ये महिलेची अमानुष धिंड… परपुरुषासोबत संबंध असल्याचा आरोप