in

राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच पत्रकार खाशोगी यांची हत्या

सौदी अरेबियन पत्रकार आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं एक मोठा खुलासा केला आहे. पत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रकार जमाल खाशोगी यांची सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली.

यासर्व प्रकारावर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं खुलासा केला. पत्रकार जमाल खाशोगी यांना पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी इस्तंबुल, टर्कीमध्ये ऑपरेशन राबवण्यास मंजूरी दिली होती, असं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं अहवालात म्हटलं आहे.खाशोगी यांची हत्या इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य कचेरीत झाली होती. या हत्येसाठी सौदी अरेबियातून जवळपास डझनभर मंडळी त्या देशाच्या सरकारी विमानातून इस्तंबूलला गेली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेसमधील G-23चे नेते जम्मूत एकत्र येणार

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ… पतीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आक्रमक