in

कंगना रणौतचं नवे ट्विट वादाच्या भोवऱ्यात, स्वत:ची तुलना केली हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीपशी

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विट म्हणजे वादाला निमंत्रण. कधी बॉलिवूडवर टीका, कधी शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. यावर कंगनाचे ट्विट नेहमी वादात असतात. आता त्यात भर पडलीय आत्मस्तुति आणि आत्मप्रौढीची. आता तर, कंगनाने स्वत:ची तुलना केली ती हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि इस्रायलची अभिनेत्री गॅल गॅडॉटशी!

जगातील कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा मी सरस आहे. याबाबत मी कुणाशीही खुली चर्चा करायला तयार आहे. कुणी ते दाखवून दिल्यास मी माझी मुजोरी सोडून देईल. तोपर्यंत मला माझ्या सरस अभिनयाचा नक्कीच अभिमान असेल, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगनाच्या या ट्विटवर टीका झाल्यानंतर थांबेल ती कंगना कसली. ‘मी किती ऑस्कर मिळवले, असा प्रश्न कुणी विचारत असेल तर, मीदेखील विचारेन मेरील स्ट्रीपने किती राष्ट्रीय पुरस्कार किंवा तिला पद्म किताबाने सन्मानित करण्यात आलंय का? उत्तर आहे नाही! आता या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडा! आत्मसन्मान आणि स्वत:चं मूल्य समजण्याची हीच वेळ आहे, असे कंगनाने म्हटले आहे.

मेरील स्ट्रीप आणि इस्रायलची अभिनेत्री गॅल गॅडॉट यांनी कंगनाचे नावही घेतले नाही. तरीही कंगनाने स्वत:ची मेरील स्ट्रीपशी तुलना करून तिच्यातच गुलामगिरीची मानसिकता असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरे म्हणजे, मेरील स्ट्रीपने कंगनाकडे कुठलीही विचारणा केलेली नाही. तरीही मेरीला राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म किताबांविषयी विचारणा कंगनाने केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरपंच, उपसरपंचपदासाठी पिंपळाच्या झाडाला नाव असलेली लिंब ठोकली खिळयाने

साताऱ्यात एसटी आगारातील शिवशाही बस पेटवणारा तरुण ताब्यात