in

टिव् टिव् बरोबर कंगनाने सुरु केलं कू – कू

लोकशाही न्यूज नेटवर्क

वादग्रस्त विधानांसाठी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूड मधील नेपोटिज्म असो किंवा शेतकरी आंदोलन ती आपले अकलेचे तारे परखडपणे सोशल मिडीयावर तोडताना दिसते. कंगनाचे अनेकांसोबत झालेले ट्विटर वॉर देखील नेहमीच चर्चेत असतात. अशातच कंगनाने आता कू या इंडियन मायक्रो ब्लॉगिंग अ‍ॅपवर एन्ट्री घेतली आहे. या संदर्भात कंगणाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.

कू अ‍ॅपवरील आपल्या बायोमध्ये कंगणाने स्वत:ला खरी देशभक्त आणि गरम रक्ताची क्षत्रिय स्त्री म्हटलं आहे. या अ‍ॅपवरील आपल्या पहिल्या पोस्टमध्ये कंगणाने ट्विटरला भाड्याचं घर म्हटलं आहे. कू-अ‌ॅपवर एंट्री करताच कंगणाच्या फॉलअर्समध्ये खूप वाढ झाली असून केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी सुद्धा कंगना रणौतला फॉलो करत आहे.

सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड क्रूचा लंच ब्रेक आहे. तेव्हा कू का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपलं घर आपलंच असतं असे तिने तिच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

टूलकिट प्रकरण; शंतनू मुळूकला न्यायालयाचा दिलासा

खासदार नवनीत राणा यांना अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी