in ,

अमेरिकन ‘फ्रीडम हाऊस’ च्या विरोधात कंगना रणौत आक्रमक

अमेरिकन थिंक टँक ‘फ्रीडम हाऊस’ने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात भारतातील हक्क आणि स्वातंत्र्याबद्दलचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. या संस्थेने या अहवालासोबत दिलेला भारताचा नकाशा चुकीचा असल्याने बॉलिवूड क्वीन कंगना रणौत आक्रमक झाली आहे.

फ्रीडम हाऊस ही जागतिक स्तरावरील संस्था असून लोकशाही मूल्ये आणि नागरी स्वातंत्र्य यानुसार जगातील देशांना ही संस्था क्रमवारी देते. या संस्थेच्या एक ट्विट करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटमध्ये मोदी सरकारच्या कारकीर्दीत भारतातील वातावरण ‘मुक्त’पासून ‘अंशत: मुक्त’ अशा स्थितीपर्यंत आले असून या सरकारच्या काळात भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ऱ्हास सुरू झाल्याचा दावाही या संस्थेने केला आहे. त्याचा प्रमाणे या सोबत शेअर केलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर देखील काढण्यात आला आहे. (हे वाचा : मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल)

या संदर्भात कंगनाने ट्विट केले आहे, यामध्ये “जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हा भाग भारतापासून वेगळ काढण म्हणजे भारताचे शीर धडापासून वेगळे करण्यासारखं आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. जेवढी स्वप्न पहायची असतील तेवढी पहा. – भारताचा प्रत्येक नागरिक ” अशा अनुशांगाचे ट्विट करत कंगनाने फ्रीडम हाऊसवर हल्लाबोल केला आहे.

फ्रीडम हाऊस
या संस्थेला अमेरिका सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. मोदी सरकारच्या कारकीर्दीत भारतातील वातावरण ‘मुक्त’पासून ‘अंशत: मुक्त’ अशा स्थितीपर्यंत आले असल्याचे फ्रीडम हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच, मोदी सरकारच्या काळात भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ऱ्हास सुरू झाल्याचा दावाही या संस्थेने केला आहे. या अहवालावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, भाजपाने या अहवालातील निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. हा अहवाल भारतविरोधी कटाचाच भाग असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका

India vs England 4th Test | टीम इंडिया अवघ्या काही धावांनी पिछाडीवर