in

वेस्टर्न आऊटफिटला पसंती देणाऱ्या कंगनाची अमेरिकन वेशभूषेवर टीका

नेहमीच वादग्रस्त विधाने ट्विट करून चर्चेत राहणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एशियंट भारत मधील एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये 3 महिला दिसत आहेत. १९८५ सालामधील डॉक्टर दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा समावेश आहे. त्या या फोटोमध्ये भारतीय पेहरावामध्ये दिसतं आहेत.

या पोस्टसोबतच “या इतिहासातील महत्वाच्या महिला असून यांनी फक्त स्वतःचे प्रतिनिधित्व न करता संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आज अशा महिलांचे फोटो काढले गेले तर ते जीन्स टॉपमध्ये असतील. यामधून फक्त पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले जाते.” असे कॅप्शन देते कंगनाने अमेरिकन वेशभूषेवर टीका केली आहे.

असे ट्विट करणारी कंगना मात्र वेस्टर्न आऊटफिटला नेहमीच पसंती देताना दिसते. सोशल मिडीयावर सोज्वळ भासवणारी कंगना खऱ्या आयुष्यात मात्र वेगळीच आहे. कंगना रणौतच्या बाबतीत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ ही म्हण लागू होते.

सध्या कंगना रणौतवर सध्या मुंबईमत तीन खटले दाखल झाले आहेत. हे सर्व खटले हिमाचल प्रदेशमध्ये हस्तांतरीत करण्यासाठी तिची खटपट सुरु आहे. यासाठी तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की मुख्यमंत्री संजय राठोडांच्या खिशात?

बिस्कीट डिझाईनच्या कॉपी संदर्भात ओरियो कंपनीची उच्च न्यायालयात धाव