in

भिवंडीत जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत, शिवसैनिकांनीही केलं स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे भिवंडी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजनोली नाका येथे कपिल पाटील यांचे आगमन होताच भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली .त्या नंतर भादवड टेमघर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना नगरसेवक बाळाराम चौधरी व स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख, गट प्रमुख आणि शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत करून सर्वांना अचंबित केले .

त्यानंतर अशोक नगर ,लाहोटी कंपाऊंड,कल्याण नाका ,एस टी स्टँड येथे स्वागत स्वीकारीत शिवाजी चौक या ठिकाणी पोहचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करत भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या सोबत टाळ वाजवीत त्यांच्या मध्ये सहभागी झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पावसामुळे झाड कोसळलं महामार्गावर, चारचाकीही झाडाला आदळल्या

पुण्यात वाहतूक पोलिसांनी चालकासह गाडी उचलली!