in

kapil sharma show|सेटवर जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांची धम्माल

‘द कपिल शर्मा शो’ च्या सीझनचा तिसरा शो लवकरच चाहत्यांच्या भेटीला. खळखळून हसवण्याचे आणि त्यांचे तूफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोमध्ये करतो. ज्याचे उद्घाटन ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’च्या कलाकारांनी केले होते. आणि दुसऱ्या भागात अक्षय कुमार आणि ‘बेलबॉटम’चे कलाकार उपस्थित होते .

मात्र यावेळी शोच्या येणाऱ्या भागात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून दिसतील. प्रोमोमध्ये आपल्याला शत्रुघ्न धर्मेंद्रची मजा घेताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडणार आहे.

प्रोमोची सुरुवात कपिलच्या प्रश्नाने झाली – त्याने विचारले कोणती हिरोईन कोणती फिल्म करते , याची खबर कोणाला असते असे विचारताच ? त्यावर शत्रुघ्न खुदकन हसून धर्मेंद्रकडे मान वळवतो आणि नॉटी असा शब्द उच्चारतो. त्यामुळे हशा पिकला. परंतु त्यानंतर शत्रुघ्न म्हणाले. बॉलिवूड क्षेत्रात जेवढे नाव यांनी कमवले तेवढे कोणीही कमवले नसेल. अश्या अनेक गोष्टी शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Narayan Rane Arrest | नारायण राणेंना अटक; केंद्रीय भाजपची पहिली प्रतिक्रिया…

‘फक्त 1 कोटी, चाहत्याच्या मागणीवर सोनू सूदचं हटके उत्तर