in

“तुम्ही ऐकलं नाही, तर वाईट परिस्थिती ओढावेल”, कपिल सिब्बल यांचा सूचक इशारा

उत्तर प्रदेशातील महत्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या गोटातून त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांनी स्वत:च्याच पक्षाला सूचक इशारा दिलाय.

जितिन प्रसाद यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्यावर टीका करतानाच त्यांनी पक्षनेतृत्वालाही सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. “दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल”, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नालेसफाईवरून शिवसेना आक्रमक; महापालिका प्रवेशद्वारावर टाकली नाल्यातली घाण

वर्ध्यातील शेतकऱ्यांना मिळाला सोयाबीन पिक विम्याचा लाभ