in ,

करीना कपूर, अमृता अरोराला कोरोना, अनेक पार्ट्यांना हजेरी

बाँलिवूड पार्ट्यामुळे अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी कोरोनाची लागण झाली आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सूपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता, बीएमसीकडून वर्तवण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सातत्याने कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांचे आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केलीय. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता व्यक्त केलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसटी कर्मचाऱ्यांशी अरेरावी काय करताय, राज ठाकरे सरकारवर भडकले…

आजचा भारत गुलामगिरीच्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे- नरेंद्र मोदी