in

सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; कर्नाटक काँग्रेसचा आरोप

कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी. तसंच हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांनी केला आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्यावर आरोप केले आहेत.

आमच्या कुटुंबांचं काही बरे-वाईट झाल्यास त्याला शिवकुमार जबाबदार असतील, असंही ते म्हणाले. आमची मुलगी एका अज्ञातस्थळी असून त्यांनी तिला परत पाठवावं, असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे. शिवकुमार यांच्याविरुद्ध राजकीय आणि कायदेशीर लढाई लढण्याचीही त्यांनी घोषणा केली.

दरम्यान, या घटनेनंतर पीडितेनं एक व्हिडिओ जारी केला आहे. मला एसआयटीसमोर हजर होऊन जबाब देण्याची भीती वाटते. मला न्यायाधीशांसमोर उभे राहून जबाब नोंदविण्यासाठी मदत करावी, असंही तिनं म्हटलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Vaishali Made : गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

बंद खोलीतले मुद्दे समोर येतील – संजय राऊत