in

कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज!

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा आपल्या पुढच्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस देण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेल्या कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

यामध्ये कार्तिक पत्रकार ‘अर्जुन पाठक’ ची भूमिका साकारून ‘धमाका’ करणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमका’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये कार्तिकच्या अभिनयाने चाहते थक्क झाले आहेत.

‘धमाका’ मध्ये, कार्तिक एका न्यूज अँकरची भूमिका साकारत आहे, ज्याला त्याच्या रेडिओ शोवर एक भयानक कॉल येतो आणि करिअरमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळते.

कोरियन चित्रपट ‘द टेरर लाईव्ह’ चा हा अधिकृत रीमेक आहे. कार्तिक अर्जुन पाठक नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत आहे. कार्तिक व्यतिरिक्त मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि विश्वजित प्रधानही यात काम करत आहेत.कार्तिक बऱ्याच काळापासून रोमँटिक-कॉमेडी भूमिका साकारतो. ‘धमाका’ त्याच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज राज्यात 1,632 नव्या कोरोनाबाधितांची भर; 40 मृतांची नोंद

अमली पदार्थांच्या आडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव – मुख्यमंत्री