in

परळीमधून नवरा विरुद्ध बायको ही लढत होणार”, करूणा शर्मा मुंडेंची घोषणा

परळीतून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढवणार आहे.वेळ आली तर परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत होईल, अशी घोषणाच शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा शर्मा मुंडे यांनी केली. माध्यमांशी बोलत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पुण्यात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये आज करूणा शर्मा मुंडे प्रवेश केला. त्यांना संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. करुणा मुंडे म्हणाल्या, “माझी घोषणा वेगळी आहे. ‘कार्यकर्ता आगे बढो, करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे’ अशी माझी घोषणा आहे. मी माझ्या लोकांची नेता झाली आहे, तर मी त्यांचा झेंडा उचलेल. मी आत्ता निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही. मात्र, जर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली, तर मी नक्कीच धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून आमदारकीची निवडणूक लढेन. नवरा विरुद्ध बायको लढत होईल.”

महाराष्ट्रात राजकीय पक्ष काढणारी मी पहिली महिला आहे. मी घराणेशाहीच्या घाणेरडे राजकारणाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. जास्तीत जास्त महिलांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मी जे करत आहे त्यासाठी अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे मला फोन आले आहेत. त्यांनी आमच्यात हिंमत नाही पण आम्ही तुम्हाला मागून पाठिंबा देऊ शकतो असे सांगितले. मी महिलांना एकच सांगेल की या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे,” असे करुणा मुंडे म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोना

IND vs SA 3rd Test Day 3 : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांची गरज!