in ,

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांचे चालक अजय मोरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ जिल्ह्यात मूसळधार पाऊस!

‘आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते’; राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर