in

Terrorists attack : काश्मिरात पुन्हा दोन परप्रांतीयांची हत्या; 3 जणांवर गोळीबार

सलग दुसऱ्या दिवशी परराज्यातुन आलेल्या कामगारांवर हल्ला

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच असून, रविवारी पुन्हा दोन परप्रांतीय कामगारांना लक्ष्य करण्यात आलं. या गोळीबारात दोघं मृत्युमुखी पडले असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. रविवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वनपोह येथे बिहारमधील मजुरांच्या घरात घुसून हा अंदाधुंद गोळीबार केला आहे. सुरक्षा दल तत्काळ घटनास्थळी पोहोचून हल्लेखोरांची शोध मोहीम सुरू आहे.


शनिवारी दहशतवाद्यांनी बिहारचा दोन रहिवाशांची हत्या केली होती. त्यामुळे आता बाहेरच्या राज्यातुन काश्मीरमध्ये कामाच्या शोधात येणारे कामगार टांगती तलवार घेउन जगत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या गोळीबारात मारले गेलेले राजा रेशी देव आणि जोगिंदर रेशी देव यांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वीटभट्टी व्यवसाय; वीटभट्टी मालकांच्या बैठकीत घेतले गेले ‘हे’ निर्णय

मेट्रोच्या वेळेत आजपासून वाढ; घाटकोपर-वर्सोवा मेट्रोच्या वेळापत्रकात बदल