in

काम सोडून अक्षय कुमार काढतोय झोपा; कतरिनाने शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये नेहमीच चित्रपटाच्या शूटिंगचे मजेशीर व्हिडिओ शेअर केले जातात. नुकताच कतरिना कैफने तिच्या इन्स्ट्राग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री कतरिना कैफ सध्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.हा व्हि़डीओ शेअर करत तिने अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केलाय. कतरिनाने शेअर केलेला हा धमाल व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

कतरिना हा व्हिडिओ शेअर करत म्हणाली आहे की, “आज सूर्यवंशीच्या प्रमोशनचा पहिला दिवस आहे आणि मी रोहित आणि अक्षयला इतकं उत्साही कधीच पाहिलेलं नाही. त्यांच्यात खूप एनर्जी आणि जोश दिसतो” अक्षय कुमार रोहितच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला दिसतोय. तर रोहितही निवांत बसलेला दिसतोय. कतरिनाला पाहताच अक्षय दचकून उठतोय आणि ती शूटिंग करू नकोस असं सांगतो. व्हिडीओ रेकॉर्ड करू नको हे बरोबर दिसत नाही आमची इज्जत राख” असं म्हणत तो उठून पळत सुटतो. यावेळी खुर्चीत पाय अडकून तो खाली पडतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवाब मलिकांनी शेअर केला समीर वानखेडेंचा जुना फोटो?

Ind Vs Pak: भारत-पाक सामन्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला