in ,

माजी नगरसेवकाने लगावली केडीएमसी सहाय्यक उपायुक्ताला कानशिलात

सुरेश काटे | कल्याणमध्ये मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. आणि या कारवाई नंतर प्रचंड वाद झाला, असून माजी नगरसेवकाने केडीएमसी सहाय्यक उपायुक्ताला मारहाण केली आहे. दरम्यान मारहाणी प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कल्याण मोहने या परिसरात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू होती. ती काम निष्काशीत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याच मोहिमे दरम्यान एका जोत्यावर कारवाई करून अधिकारी अ प्रभाग कार्यालयात आले त्यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मुकुंद कोट हे आपल्यासोबत 15 ते 20 जणांना घेऊन अ प्रभाग क्षेत्रातील सावंत यांच्या कार्यक्षेत्रात शिरले, यावेळी कोट यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत यांच्या कानशिलात लगावली.
धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्तांच्या समोर सहाय्यक उपायुक्तांना मुकुंद कोट या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याने कल्याण डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात मुकुंद कोट आणि पंधरा ते वीस जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे मारहाण करणे अशापद्धतीचा गुन्हा दाखल केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तीन मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन, नवऱ्याने घेतली पत्रकार परिषद

मोठागाव पूल ते गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या कामासाठी 661.36 कोटीची मान्यता