in ,

शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारासाठी घरीच नजरकैदेत ठेवा, सचिन वाझेची न्यायालयाकडे मागणी

अँटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील आरोपी सचिन वाझेने सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नवा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्याने ह्रदयावरील शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी घरीच नजरकैदेत ठेवा अशी मागणी केली आहे. यानंतर न्यायालयाने वाझेंच्या मागणी अर्जाची दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणांनेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

अँटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह नऊ आरोपींना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यांना तळोजा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तुरुंगात असताना हार्टचा त्रास होऊ लागल्याने त्याला ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याच आले होते.

मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पूर्णपणे बरे होईपर्यंत उपचारासाठी घरीच नजरकैदेत ठेवा, यासाठी वाझेच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. याची दखल घेत न्यायालयानं एनआयएला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी २७ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्त्रीवादी आयकॉन कमला भसीन यांचे निधन

Amazon Primeने भारतात सुरू केले प्राईम व्हिडिओ चॅनल, जाणून घ्या अॅप्सची किंमत